HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसला १२ मंत्रिपदे, त्यापैकी १० कॅबिनेट, बाळासाहेब थोरातांची माहिती

नवी दिल्ली | राज्यात महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. तिन्ही पक्षातील मंत्र्यांच्या नाव शिक्कमोर्तब झाला आहे. मंत्रालयाच्या प्रांगणात उद्या (३० डिसेंबर) दुपारी १२. ३० वाजता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (२९ डिसेंबर) दिल्लीला जावून सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी काँग्रेसच्या नेत्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आज जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. थोरात पुढे म्हणाले की, काँग्रेसचे १२ मंत्री असणार आहेत, त्यापैकी १० कॅबिनेट मंत्री असतील,” असेही त्यांनी सांगितले.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर तिन्ही पक्षातील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यात सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी तात्पुरते खाते वाटप करण्यात आले. महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या टप्प्यात ३६ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य नेत्यांची यादी एच. डब्ल्यू. मराठीच्या हाती लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

अनिल देशमुख

जितेंद्र आव्हाड

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

बाळासाहेब पाटील

धनंजय मुंडे

राजेश टोपे

डॉ. राजेंद्र शिंगणे

दत्ता भरणे

किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री

उत्तर महाराष्ट्र

के. सी. पाडवी

मराठवाडा

अशोक चव्हाण

अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदम

प्रणिती शिंदे

विदर्भ

विजय वड्डेटीवार

यशोमती ठाकूर

मुंबई

अमिन पटेल

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार

मुंबई

रवींद्र वायकर

सुनील प्रभू

ऍड अनिल परब

ठाणे

प्रताप सरनाईक

डॉ.बालाजी किणीकर

कोकण

उदय सामंत

दीपक केसरकर

भास्कर जाधव

विदर्भ

संजय राठोड

आशिष जयस्वाल

बच्चू कडू ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले)

उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील

दादा भुसे

सुहास कांदे

मराठवाडा

अब्दुल सत्तार

संजय शिरसाठ

डॉ.संदीपन भुमरे

राहुल पाटील

पश्चिम महाराष्ट्र

तानाजी सावंत

शंभूराजे देसाई

प्रकाश अबिटकर

महिला आमदारांमध्ये

डॉ. नीलम गोऱ्हे

मनीषा कायंदे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंच्या भीक मांगो आंदोलनावर शशिकांत शिंदे म्हणतात…

News Desk

नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरेंनी केले तिरुपती देवस्थानास सुपूर्द

News Desk

भाजपमधून एक्झीट घेत आणखी एक नेता राष्ट्रवादीची वाट धरणार?

News Desk