HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपमधून एक्झीट घेत आणखी एक नेता राष्ट्रवादीची वाट धरणार?

पंढरपूर | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा, आमदारांचा सपाटा सुरूच आहे. अशात भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सरकोली येथे आज झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले आहे. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले आहे. त्यामूळे राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

नेमकी कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष

सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार लवकरच शस्त्रक्रिया

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघातः खा. अशोक चव्हाण

News Desk