HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली तरी मुक्ती मिळणार नाही!

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर त्यांनी नवीन कार्यालय घेतल्याने अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. याच मुद्याचा धागा पकडत कंगणाने मातोंडकर यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर कंगणाच्या ट्विटवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजप आणि भाजपचं हे मोठं षडयंत्र होतं, हा कबूलीजबाब असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नसल्याचं म्हणत सावंतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांंनी ट्विट केलं आहे. दरम्यान, सचिन सावंत यांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्री राजी तर पुन्हा होईल चर्चा!

News Desk

क्रांती रेडकरांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला FIR

News Desk

INS विक्रांत प्रकरणी नील सोमय्यावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Aprna