HW News Marathi
महाराष्ट्र

समाजविघातक घटक सांगून परवानगी न घेता फोन टॅपिंग केल्याचा राऊतांचा आरोप

मुंबई | नाना पटोले, एकनाथ खडसे आणि माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचे खोटे सांगून आमचे फोट टॅप करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपवर केला आहे.  सध्या काही हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजत आहेत. ते सर्व ढोंग सुरू असून यासंदर्भात केंद्राने भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण आखण्याची आहे. पंतप्रधानांनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे असून हे धोरण राबवण्याीच सुरुवात  उत्तर प्रदेशमधून करावी, अशी मागणी त्यांनी  आज (२० एप्रिल) माध्यमांशी बोलताना केला आहे. 

राऊत म्हणाले, “नाना पटोले, एकनाथ खडसे आणि माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचे खोटे सांगून आमचे फोट टॅप करण्यात आले. गृहविभागाकडून आम्ही सामाजविघाट घटक असल्याचे सांगत फोन टॅपिंगची परवानगी रश्मी शुक्ला यांनी घेतली. त्यावेळी राज्यात महाविकासआघाडी सरकार तयार होत होते. आमच्यावर नजर ठेवण्यासाठी आमचे फोन टॅपिंग करून आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. एका पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करण्याची अपेक्षा ठेवतो. परंतु, एका राजकीय पक्ष आणि नेत्याला प्रति आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आणि आता रश्मी शुक्लांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे, ” असा आरोप त्यांनी केला आहे. 

सध्या राज्यात जे काही हिंदुत्वाच्या नावावर भोंगे वाजत आहेत ना. ते सर्व ढोंग सुरू असून हे ढोंग फार काळ चालणार नाही. परंतु, यामुळे हिंदुत्व बदनाम होत असून हिंदुत्वासंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. या प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारने भोंग्यांचे राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे असून हे धोरण राबवण्याीच सुरुवात उत्तर प्रदेशमधून करावी, अशी मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पूरग्रस्त भागातील दौरे टाळा”, शरद पवारांचं नेत्यांना आवाहन

News Desk

वर्षपूर्तीच्या आनंद संपायच्या आत काँग्रेसचे इशारे सुरू, भाजपचा टोला

News Desk

आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही! – संजय राऊत

News Desk