HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे !  मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई | “महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे”, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१४ ऑगस्ट) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. “तुम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सर्वांचेच कौतुक केले आहे.

Related posts

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

Cyclone Nisarg : नुकसान झालेल्यांना योग्य भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल !

News Desk

काँग्रेस १२ मेपासून करणार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा

News Desk