मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रा काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचीच चर्चा राजकीय वर्तृळात खुप सुरु होती. अखेर या चर्चांना आता पुर्णविराम लागला आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर नाना पटोले यांची वर्णी लागली आहे. कॉंग्रेसकडून अधिकृत घोषणा करत नाना पटोले हे महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या कार्यकारणीत ६ कार्यकारी अध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष असणार आहेत.
कॉंग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्ष कोण?
१. शिवाजी मोघे (यवतमाळ)
२. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
३. नसीम खान (मुंबई)
४. कुणाल पाटील (धुळे)
५. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
६. प्रणिती शिंदे (सोलापूर)
काँग्रेसचे १० नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?
१. शिरीष चौधरी (जळगाव)
२. रमेश बागवे (पुणे)
३. हुसैन दलवाई (मुंबई)
४. मोहन जोशी (पुणे)
५. रणजीत कांबळे (वर्धा)
६. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
७. बी. आय. नगराळे
८. शरद अहेर (नाशिक)
९. एम. एम. शेख (औरंगाबाद)
१०. माणिकराव जगताप (रायगड)
Nana Patole has been appointed as the President of Maharashtra Pradesh Congress Committee. (File photo) pic.twitter.com/YdbnalZ5hU
— ANI (@ANI) February 5, 2021
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल (४ फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन नाना पटोले यांनी आपला राजीनामा सोपवला होता. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नाना पटोले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटलं, हायकमांडच्या आदेशानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात अद्याप मला कोणतीही माहिती नाही आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.