HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

राज्यात आज ४,८७८ कोरोना रुग्णांची नोंद, तर २४५ जणांचा मृत्यू

मुंबई। राज्यात आज ४ हजार ८७८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यभरात आज २४५ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील आहेत तर, उर्वरित १५० मृत्यू मागील कालाधीत आहेत. राज्यातील मृत्यूदर सध्या ४. ४९ इतका आहे. आज १ हजार ९५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ९० हजार ९११ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून बरे होऊन होऊन घरी गेले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (३० जून)दिली.

 

सध्या राज्यातील विविध रुग्णालयात एकूण ७५, ९७९ अॅक्टिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहे. राज्यात ५,७८,०३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,६६,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,७४,७६१(१८.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Related posts

१७ मेनंतर काय ? सोनिया गांधींचा सवाल

News Desk

महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे !

News Desk