मुंबई | राज्याच्या कोरोनास्थितीबाबा एक अत्यंत दिलासादायक बातमी येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात वाढलेले संसर्ग आता नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत असून राज्यतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत आहे.राज्यातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा तब्बल महिन्याभराहून अधिक काळानंतर आज (१० मे) थेट ४० हजारांच्या खाली गेला असून राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार २३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल ६१ हजार ६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकड्यातली लक्षणीय घट तर दुसरीकडे कोरोनमुक्तांचा मोठा आकडा ही राज्यासाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे.
Maharashtra reports 37,236 new positive COVID-19 cases, 549 deaths and 61,607 recoveries in the last 24 hours
Total active cases: 5,90,818
Total positive cases: 51,38,973
Total death toll: 76,398
Total recoveries: 44,69,425 pic.twitter.com/iSFVnim0bE— ANI (@ANI) May 10, 2021
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३७ हजार २३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच २४ तासांत ६१ हजार ६०७ नवे रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, रुग्णसंख्या कमी होणे ही राज्यासाठी दिलासादायक वृत्त असले तरीही ह्यात सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९० हजार ८१८ इतकी आहे. तर, राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५१ लाख ३८ हजार ९७३ एवढी असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४४ लाख ६९ हजार ४२५ एवढी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण ७६ हजार ३९८ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.