मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज (१ नोव्हेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ३६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६ लाख ८३ हजार ७७५ वर पोहोचला आहे. तर, याच एका दिवसात ३ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे ११३ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुक्तांचा आकडा दिलासादायक असून कोरोनास्थिती नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट देखील आता ८९.९२ टक्क्यांवर पोहचला आहे. तर राज्यात सद्यस्थितीत एकूण १६ लाख ८३ हजार ७७५ कोरोनाबाधितांपैकी १ लाख २५ हजार १०९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर १५ लाख १४ हजार ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे आतापर्यंत राज्यात एकूण ४४ हजार २४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
Maharashtra reports 5,369 new #COVID19 cases, 3,726 discharges and 113 deaths, as per State Public Health Department.
COVID-19 tally of the State rises to 16,83,775 including 15,14,079 recoveries and 44,024 deaths. Active cases is at 1,25,109. pic.twitter.com/7dp1x71Js7
— ANI (@ANI) November 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.