HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राज्यात आज १६ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’ तर ७ हजारांहून अधिक ‘कोरोनाबाधित’

मुंबई | महाराष्ट्रात सातत्याने वाढणारा कोरोनामुक्तांचा आकडा अत्यंत दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२२ ऑक्टोबर) देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १६ हजार १७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर याच एका दिवसात राज्यात ७ हजार ५३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे गेल्या २४ तासांत १९८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १६ लाख २५ हजार १९७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे १ लाख ५० हजार ११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ३१ हजार ८५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ८८.१ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ८४ लाख २ हजार ५५९ कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्यांपैकी १६ लाख २५ हजार १९७ कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात २४ लाख ५९ हजार ४३६ व्यक्ती होम क्वारंटाइन, तर २४ हजार ६२१ व्यक्ती इंस्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

Related posts

आम्ही काँग्रेसला आमच्या साडे चार वर्षांचा हिशोब देऊ इच्छित नाही !

अपर्णा गोतपागर

#Coronavirus : मुंबईत प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू

News Desk

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

News Desk