HW Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे चंद्रपुरातील आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा

चंद्रपूर |  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आज (२० मार्च) राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने धानोरकरांनी राजीनामास्त्र उपसलेस असून भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. धानोरकर काँग्रेसमधील प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे.

युती अस्तित्वात आल्यानंतर धानोरकरांनी मंत्र्यांवर टीकेचे बाण अधिक उग्र केले होते. काँग्रेसचे स्थानिक नेते चंद्रपूर लोकसभा निवडणूकीची उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीत प्रयत्नशील असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेकडून ते शक्य नाही म्हणून आपण आमदारकी व शिवसेना पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Related posts

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढली हे तर गडकरींचे यश

News Desk

अवैध धंदे बोकाळल्याने महिला संतप्त

News Desk

बेजबाबदार नागरिकांमुळे शहरातील समस्या वाढल्या

News Desk