HW News Marathi
Covid-19

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

बीड | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात धनंजय मुंडे त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांचा काल (११ जून) रात्री कोरोना चाचाणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, धनंजय मुंडे हे बुधवारी (१० जून) मंत्रिमंडळाची बैठक आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी धनंजय मुंडे यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला होता. तसेच धनंजय मुंडे यांचा मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या बंगलाच्या परिसरात कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत.

महाविकसाआघाडी सरकारमधील धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहे की, ज्या कोरोनाची लागण झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसरे नेते ज्यांना कोरोनाची लागण झाली. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या दोघांनी कोरोनावर मात केली आहे.

विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी ८ जून रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते. या लोकार्पम सोहळ्यात अनेक जण उपस्थित होते. त्यामुळे आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, सरकारकडून नवे नियम जारी

News Desk

ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येणार 

News Desk

नागपूरमध्ये आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची महत्वाची घोषणा

News Desk