HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रपुरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याचे मुनगंटीवार यांचे आदेश

नागपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ एका वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. आज (८ जुलै) सकाळी ही घटना घडकीस आली. या वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एक वाघीण आणि दोन बघडे यांच्‍या झालेल्‍या संशयास्‍पद मृत्‍युची सखोल चौकशी करण्‍याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

या प्रकरणी घातपात किंवा शिकार झाली असल्‍यास सक्षम यंत्रणेद्वारे त्‍याचा तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असे आदेश मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन्‍यजीव) यांना दिले आहे. मेटेपार गावालगत वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत दोन बछडे साधारण आठ ते नऊ महिन्यांचे आहेत. त्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना कळविली आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचे डीएफओ कुलराज सिंग, चिमूरचे वनपरिक्षेत्र अदिकारी चिवंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार! कोरोना आढावा बैठकीत घेतला निर्णय

News Desk

“विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा”, राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध

Aprna

अहो पक्षप्रमुख, खरचं मर्द असाल तर सांगून टाका की शिवसेना  ‘सेक्युलर’ झाली – नितेश राणे

News Desk