HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraBudget Live Updates : आमदार विकास निधी २ कोटीवरून ३ कोटीवर

मुंबई | राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या वेगळ्या विचार धारा एकत्र येवून महाविकासआघाडी आघाडीचे सरकार स्थापन झाले. या महाविकासआघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. महाविकासआघाडी सरकारला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहे. आता ठाकरे सरकारचा आज (५ मार्च) हा महत्तवाचा आहे. कारण आज महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळ सादर होणार आहे. हा पहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर होणार आहे.

राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वी महाविकासआघाडीची सकाळी १०.३० वाजता कॅबिनेट बैठक होणार असून यात राज्याच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे. याआधी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

  • राज्यात पेट्रोल-डिझेलवर १ रुपयावर अतिरिक्त कर
  • बांधकाम व्यवसायला चालना देण्यासाठी , पुढली २ वर्षात मुद्रांत शुल्कात १ टक्क्याची सवलत दिली आहेत
  • मुंबई, पुण्यात मुद्रांक शुल्कार १ टक्के सवलत देणार
  • तृथीयपंथिसाठी मंडळ उभारणार
  • नाट्यसंमेलनासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद
  • आमदाराच्या विकासासाठी २ कोटीवरून ३ कोटी निधीची तरतूत, अजित पवारांची मोठी घोषणा
  • पर्यावरण विभागासाठी २३० कोटीच्या निधीची तरतूद
  • हाजी अली विकासाचा आराखडा तयार करणार
  • मुंबईत वरळीमध्ये जागतिक पर्यटन केंद्र उभारणार
  • वाशीत सिडकोच्या मदतीने महाराष्ट्र भवनाची निर्मित करणार
  • प्लास्टिक वापर टाळण्यासाठी सरकार प्राधान्य देणार आहे
  • वडाळ्यात वस्तू व सेव कर उभारणार
  • मराठी भाषाच्या विकासासाठी मराठी भाषा भवन बांधणार
  • सर्व माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवणार
  • प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे उभारणार, यात सर्वच महिला कार्यरत असणार
  • महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध
  • राज्यात मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबविणार
  • पहिल्या महिला धोरणारला २५ वर्ष पुर्ण झाल्याची अजित पवारांनी सांगितले.
  • तरुणांसाठी नवीन उद्योग उभारण्यासाठी भर देऊ
  • बेरोजगार तरुणांना प्रशिक्षिण देण्यावर सरकारवर भर
  • प्रत्येक हताल काम देण्याचा सरकारचा निर्णय आहे
  • आरोग्य विभागासाठी ५ हजार कोटीची तरतुद
  • मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विशेष तरतुद
  • बालेवाडी आंतरराष्ट्रयी क्रीडा विद्यापीठ सुरू करणार
  • सिंचनाला प्रधान्य देण्यासाठी
  • पुण्यात ऑलिम्पिक भवन बांधण्याचा प्रस्ताव
  • शालेय शिक्षणासाठी २५५० कोटी देणार
  • येत्या ३ वर्षात ग्रामीण भागात रुग्णालायसाठी इमारती बांधणार
  • राज्यात ४७ डायलिसीट सेंटर उभारणार
  • ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर भर देणार
  • प्राथमिक आरोग्यासाठी ५ हजार कोटींची तरतुद
  • २०२४पर्यंत राज्यात सर्व ग्रामपंचायतीचे स्वत:चे कार्यलय होणार आहे
  • एसटीच्या जुन्या बस बदलून नव्या १६०० बस उपलब्द करणार
  • सोलापूर आणि पुण्यात नवीन विमातळ उभारणार
  • पुण्यातील मेट्रोचा विस्तार करणार असून स्वागरगेट ते कात्रजपर्यंत
  • मीरा-भाईंदर ते डोंबिवली नवी रस्ते वाहतूक योजना
  • अजित पवारांनी सभागृहात केंद्रीय कॅबिनेटमंत्री नितीन गडकरी यांचे अभार मानले.
  • कोकणाच्या विकासाठी सरकार प्राधान्य देणार – अजित पवार
  • नागपूर जिल्ह्यात उर्जा पार्काची उभारणी करणार
  • पशु आणि दुग्ध विभागासाठी २ हजार कोटीची तरतुद
  • शेतीसाठी दिवसा विज पुरवाठ पुरवण्यावर भर देणार
  • सौर कृषीपंप योजनेसाठी ६७० कोटींच्या निधीची तरतूद
  • राज्यातली भूजल पातळी वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करणार
  • जलसंपदा विभागासाठी १० हजाल २५ कोटीची निधीची तरतूद
  • नियमित कर्ज भरणाऱ्याला ५० हजार प्रोत्साहनपर देणार
  • पायाभूत सुविधांसाठी २ लाख ४८ हजार कोटींची कर्ज
  • अतिवृष्टीतचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना केंद्रच्या मागणीची वाट न बघता राज्य सरकारने मदत केली – अजित पवार
  • लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतला मोठा फटका बसला आहे – अजित पवार
  • शेतकऱ्यांच्या निर्णयासाठी महविकासआघाडी निर्णय घेते
  • देशाचा विकासदर पहिल्यांदाच ५ टक्क्यांच्या खाली गेला – अजित पवार
  • शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न, शेतकऱ्यांना हेलमेट न घालत कर्जमुक्ती दिली – अजित पवार
  • अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली
  • अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कॅबिनेट बैठकी सुरू
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानभवनात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला आहे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल
  • ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद

News Desk

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणे देशाला चालावं लागेल!

News Desk

रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली

News Desk