मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांच्या दररोज वाढणाऱ्या आकड्यात आज (१ सप्टेंबर) पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ७६५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यातील आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची अधिकृत आकडेवारी दिली आहे.
राज्यात सद्यस्थितीत कोरोनावर विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची अर्थात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ५२३ इतकी आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत तब्बल ५ लाख ८४ हजार ५३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट आता ७२.३२% इतका आहे. तर आतापर्यंत तब्बल २४ हजार ९०३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
Maharashtra's #COVID19 case tally rises to 8,08,306 with 15,765 fresh cases reported today.
The numbers of active and recovered cases in the state are now 1,98,523 and 5,84,537, respectively. Recovery rate in the state is 72.32%. Death toll 24,903: State Government pic.twitter.com/sqbdDlwhOx
— ANI (@ANI) September 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.