HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 2)

शेतकऱ्यांसाठी काय?

  • जलसंपदा विभागाकरता 8233 कोटी – अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
  • कोकणातील पाटबंधारे प्रकल्पासाठी 60 कोटी तरतूद
  • जलयुक्त शिवार – 1500 कोटी
  • 82,000 सिंचन विहिरी पूर्ण – 132 कोटी विहीरींसाठी
  • मागेल त्याला शेततळे या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण (160 कोटीची तरतूद)
  • सूक्ष्म सिंचन – 432 कोटी
  • कृषी विभागातर्फे वनशेतीस प्राधान्य – 15 कोटीची तरतूद
  • सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटीची तरतूद
  • फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड योजना – 100 कोटी
  • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेकरीता 50 कोटी
  • कर्जमाफी – 45.33 लाख कर्जखातेदारांना लाभ देण्याची बँकांना मान्यता (35.68 लाख खातेदारांना रकमेचा लाभ)
  • 93,322 कृषी पंपाना विद्युत जोडणीसाठी 750 कोटींची तरतूद
  • गोदामाची योजना, तसेच मालवाहतूक जलद वेगाने व्हावी यासाठी एसटीची नवी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात येईल, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल
  • राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार (ई नाम)
  • 142 कोटी निधी – एसटी बसस्थानकांच्या डागडुजीसाठी उपलब्ध

उद्योग/व्यवसायासाठी काय?

  • वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक नवा कार्यक्रम सुरु
  • विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सूत गिरण्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल
  • फिन्टेक धोरणांतर्गत सामायिक सोयीसुविधांसाठी भांडवली सहाय्य देण्यात येईल
  • विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांना सूट आणि निर्मिती करणाऱ्याला विशेष सहाय्य देण्यात येईल
  • सूक्ष्म व लघु उद्योगांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष योजना
  • राज्यातील काथ्या उदयोग वाढीसाठी – 10 कोटीचा निधी
  • हस्तकला उद्योगासाठी – 4 कोटी 28 लाख
  • वर्धा इथे मातीकलेचे मंडळ – 10 कोटी
  • सामूहिक उद्योग प्रोत्साहनासाठी 2620 कोटी

पाणी, कचरा व्यवस्थापन व स्मार्ट सिटीसाठी तरतूद

  • ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन – राज्यातील 15,000 लोकसंखा असलेल्या गावासाठी नवीन योजना – 335 कोटी
  • नागरी पाणीपुरवठा, मलनिसारण यासाठी 7,750 कोटी केंद्राची मदत आहे, राज्याकडून 2,310 कोटींची तरतूद
  • मोर्णा नदी अकोल्यातील नदी स्वच्छता मोहीत नागरिकांनी हाती घेतली, त्यांना मदत करण्यासाठी – 27 कोटी
  • सागरी किनारा संवर्धनासाठी 9 कोटी 40 लाख
  • घनकचरा व्यस्थापनासाठी – 1,526 कोटी
  • ओलव्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मितीसाठी अनुदान देण्याचा मानस – 5 कोटी
  • स्मार्ट सिटी अभियानासाठी 1,316 कोटींची प्रस्तावित
  • नागरी पायाभूत सुविधांसाठी – 900 कोटी तरतूद
  • स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. 1 हजार 526 कोटी निधीची तरतूद

रस्ते व ऊर्जा प्रकल्पासाठी तरतूद

  • समृद्धी महामार्ग – ग्रिनफिल्ड रेखेला मान्यता. 701 किमी लांबी – 99 टक्के संयुक्त मोजणी पूर्ण, भूसंपादनाची 64 टक्के प्रक्रिया पूर्ण, डिझाईन प्रगतीपथावर, एप्रिलपासून काम अपेक्षित
  • रस्ते विकासासाठी – 10,828 कोटींची तरतूद
  • नाबार्डअंतर्गत रस्ते पूल बांधणीसाठी – 300 कोटी
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची क्षमता वाढण्याचे काम हाती
  • दुपदरीकरणासाठी – 26,000 कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – 2,255 कोटी 40 लाख निधी
  • भाऊचा धक्का ते अलिबाग दरम्यान जलवाहतूक एप्रिलपासून सुरु होणार
  • मिहान प्रकल्पासाठी – 4,066 कोटींचे सामंजस्य करार
  • महावितरण कंपनीकरता शासनाच्या भागभांडवलापोटी रक्कम दिली
  • महानिर्मिती कंपनीचे नवीन औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहेत – त्यासाठी 404 कोटींची तरतूद
  • घारापुरी लेण्याला प्रथमच वीज पोहोचवली – 22 कोटींचा खर्च
  • बस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता 40 कोटींची तरतूद
  • सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दिवसा शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा – त्यासाठी प्रकल्प सुरु होतोय – ग्रीन सेस फंडातून 375 कोटींचा निधी
  • डी आणि डी + उद्योगांसाठी वीजबिलात सवलतीसाठी – 926 कोटी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलाब चक्रीवादळाचे ठाण्यात आगमन!

News Desk

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

News Desk

पंकज मुंडेंच्या आवाहनाला जनतेने दिली साथ, गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथीला घरातून वाहिली श्रद्धांजली

News Desk