HW News Marathi
महाराष्ट्र

महात्मा गांधींचे मारेकरी जिवंत, कालीचरण महाराजांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

मुंबई | सध्या वेगवेगळ्या राज्यात हिंदू धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे. तर छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या संदर्भातील कालीचरण महाराजांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विधीमंडळात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली आहे. महात्मा गांधी यांचा केलेला अपमान सहन करणार माही. कालीचरण महाराजांवर कडक कारवाई करावी. तसेच त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात नवाब मलिक यांनीही ट्विट करत कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. ‘असत्य आणि हिंसक कधीच सत्य व अहिंसेचा पराभव करू शकत नाही. बापू, आम्हाला लाज वाटते, तुमचे मारेकरी जिवंत आहेत’, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे. तसेच या ट्विटसोबत नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ महंत राम सुंदर यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्यावर महंत राम सुंदर टीका करत आहेत. तसेच या धर्मसंसदेतून ते बाहेर जाताना दिसत आहेत. तर या व्हिडीओमध्ये महंत यांच्या या कृतीवर त्यांचं कौतुक होताना दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

रायपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज म्हणाले की, मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी १९४७ मध्ये देशावर ताबा मिळवला होता. सुरुवातीला इराण, इराक आणि मग अफगाणिस्तानवर त्यांनी ताबा मिळवला आहे. तसेच त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही राजकारणाच्या माध्यमातून ताबा मिळवला आहे, असे ते म्हणाले. याशिवाय महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारले असून मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आणि इतर सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

बिहारची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार – खासदार प्रफुल पटेल

News Desk

निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी, त्यापैकी १०६ पुण्यात आढळले !

swarit

सॅम डिसुझा आणि मोहित कंबोजच ड्रग्ज प्रकरणाचे खरे मास्टरमाईंड | सुनील पाटील

swarit