HW News Marathi
महाराष्ट्र

भोकर आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी महेश नारलावार

भोकर | आर्य वैश्य (कोमटी) समाज सेवा व आरक्षण मागणी लढ्यासाठी सबंध महाराष्ट्रात आंदोलन उभे करण्यास्तव समित्या स्थापन करण्यात येत असून भोकर आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी महेश नारलावार यांची तर आरक्षण समिती अध्यक्षपदी निशिकांत तुप्तेवार यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

ओम लाॅन्स् भोकर येथे समाजाचे युवा नेते दत्तु बंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.४ फेब्रुवारी २०१७ रोजी तालुक्यातील आर्य वैश्य ( कोमटी ) समाज बामधवांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. सामाजिक कार्य व आरक्षण लढा गतीमान करण्यासाठी या बैठकीत सर्वानुमते आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी येथील सेवाभावी युवा नेतृत्व महेश वारलावार यांची तर आरक्षण समिती अध्यक्षपदी निशिकांत तुप्तेवार यांची निवड करण्यात आली आहे.तर उर्वरीत युथ कार्यकारीणी पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

चेतन लाभसेटवार (उपाध्यक्ष ),साईप्रसाद जटालवार (उपाध्यक्ष ),राम पोकलवार ( उपाध्यक्ष ),व्यंकटेश पोकलवार ( सचिव ),द्वारका बासटवार ( सहसचिव ),अजय न्यालमवार (कोषाध्यक्ष ),अमोल मारूडवार ( सहकोषाध्यक्ष ), मनोज मनुरवार ( कार्याध्यक्ष ),संतोष चक्रवार (संघटक ),राजेश्वर कोंडावार ( प्रसार प्रमुख ),बचत गट अध्यक्ष पदी राजेश्वर बंडावार , गोविंद तुप्तेवार ,सल्लागार समिती सदस्य बालाजी बच्चेवार ,श्याम पोकलवार,नागेश गंदेवार ,गोपाल कुंडगुलवार ,संदिप चौलवार ,बालाजी पातावार आदी जणांचा समावेश आहे.

तर उर्वरीत आरक्षण समिती पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. किरण मुत्तेपवार ( उपाध्यक्ष ), महेश प्रतापवार (उपाध्यक्ष ),साईप्रसाद जटालावार ( कार्याध्यक्ष ),विजयकुमार कमटलवार (सचिव ),अमोल मारूडवार (सहसचिव ),राजेश्वर बंडावार ( कोषाध्यक्ष ),राजेश्वर कोंडावार( संघटक ),मार्गदर्शक -संतोष वट्टमवार(परळीकर ),सदाशिव ताटकोंडवार तसेच सदस्य पदी केतन पोलशेटवार ,बालाजी बासटवार,साईनाथ बासटवार, पांडुरंग पालदेवार,सुरेश पालकृतवार,अजय न्यालमवार, सचिन बोपेवार,संतोष चक्रवार,स्वप्निल पोकलवार, पवण चलमेलवार,पवण दमकोंडवार आदींची निवड करण्यात आली.या प्रसंगी नितीन तुप्तेवार,दत्तु बंडावार, प्रशांत पोपशेटवार,गोपाल कुंडगुलवार, महेश नारलावार,यांसह आदी समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत समाजाला आरक्षण मिळवण्याचा लढा आधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला व नांदेड येथे होणार असलेला विभागीय मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.उपरोक्त दोन्ही नवनिर्वाचित कार्यकारीणी पदाधिका-यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत असून भावी कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे! 

News Desk

१० रुपयाचे नाणे घेण्यास ग्रामीण भागातील बँकांचा नकार ,मॅनेजरने शेतक-याला बँकेतून बाहेर काढले.

News Desk

हेच काय तुमचे हिंदुत्व?, सामनातून भाजपवर टीका

News Desk