HW News Marathi
महाराष्ट्र

योगीजी पहिले उत्तरप्रदेश भयमुक्त करा मग व्यापाऱ्यांना, फिल्म अभिनेत्यांना बोलवा – महेश तपासे

मुंबई | योगीजी पहिल्यांदा उत्तरप्रदेश भयमुक्त करा आणि मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला लगावला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इंडस्ट्री नेण्याबाबत मुंबईमधील अभिनेत्यांशी चर्चा करायला आले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

योगीजी तुम्ही एक गोष्ट विसरलात उद्योग व व्यापाराकरिता भयमुक्त वातावरणाची आवश्यकता लागते जे तुमच्या उत्तरप्रदेशातील नागरिकांना तुम्ही देऊ शकला नाहीत. दिवसा ढवळ्या बलात्कार, लूटमार, अपहरण हे तुमच्या राज्यातली रोजची घटना झाली आहे. मग उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांचे संरक्षण तुम्ही कसे करणार असा प्रश्नही महेश तपासे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुक्त संजय पांडे यांचा हस्ते पात्र सहायक पोलीस उप निरीक्षकांना पदोन्नती

Aprna

MIMने आपण भाजपा विरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावं! – अतुल लोंढे

Manasi Devkar

“देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का?”

News Desk