HW News Marathi
महाराष्ट्र

प्रणिती शिंदेंना सोलापूरचे पालकमंत्री करा, भाजप नगरसेवकाची अजब मागणी

सोलापूर | सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवस ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र या बैठकीवर आंदोलनाचे सावट दिसून आले. दरम्यान, प्रणिती शिंदे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदावर नियुक्ती करावी, अशी अजब मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे आले होते. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली.

सोलापुरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांचा तुटवडा आहे. मात्र, पुण्यात सर्व औषधे मिळतात. सोलापूरसाठी आतापर्यंत तीन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. मात्र हे सर्व पालकमंत्री बिनकामाचे असून सोलापुरातील आमदारांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत; दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांची पळवाट बंद

Aprna

राज्यपालांनी राजभवनाच्या बाहेर येत राजकारण करावे – संजय राऊत

News Desk

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Aprna