HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार पुत्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी देवीचा दुग्धाभिषेक व महापूजा केली जातेय 

मुंबई | कोरोनामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले तर काही जण बरे होऊन घरी गेले.सामान्यांपासून सिनेतारका, नेतेमंडळी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आपण पहिले. त्यातच आता आमदार पुत्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी देवीचा दुग्धाभिषेक व महापूजा केली जात आहे.आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा नुकताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. फेसबुकच्या माध्यमातून मल्हार पाटील यांनी ही माहिती दिली होती. दरम्यान मल्हार पाटील कोरोना मुक्त व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी धारासूर मर्दिनी देवीचा दुधाचा अभिषेक करून पूजा केली आहे.

‘कोरोना चाचणीप्रमाणे माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथील कोव्हीड सेंटर येथे दाखल झालो असून येथे उपचार घेत आहे आमदार राणादादांच्या स्टाफ मधील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची चाचणी केली असता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अहवाल निगेटीव्ह आले आहेत. माझी देखील तपासणी केली असून माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी सांगितले’, अशी पोस्ट मल्हार पाटील यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, अधिवेशनाचा कालावधी लवकरच ठरणार

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली

News Desk

“भ्रष्टाचार म्हणजे काय?”, सामनाच्या अग्रलेखातून दिले उत्तर

News Desk