HW News Marathi
महाराष्ट्र

जामीनासाठी नवाब मलिकांच्या मुलाकडे मागितली 3 कोटीची लाच

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जामीन देण्यासाठी त्यांच्या मुलाकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. व्हीबी नगर पोलीस ठाण्यात मलिकांच्या मुलाने इम्तियाज या नावाच्या एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने मलिकांवर कारवाई कोली होती. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मलिकांना जामीन मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाला इम्तियाज या व्यक्तीने तीन कोटी रुपयांची मागणी केली. या व्यक्तीने तीन कोटीची रक्कम ही बिटकॉइन्समध्ये मागितली होती. मलिकांच्या मुलाला दुबईहून हा फोन आल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून मिळाली आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांची बहीण हसिना पारकरकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची ३ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. मलिकांना ही जमीन ५५ लाखाला मिळाली होती. या जमिनीची सध्याची किंमत ३०० कोटीची असल्याची माहिती ईडीच्या तपासातून मिळाली आहे. यात गैरव्यवहारच्या पार्श्वभूमीवर ईडीने मलिकांना २३ फेब्रुवारी सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेहण्यात आले होते. यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना ईडीच्या कोठडीत ठेवले होते. यानंतर मलिकांना ई़़डीने मला केलेली अटक ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा चुकीचा असल्याचे न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले. तपास यंत्रणांची कारवाई ही नियमानुसार असल्याचे न्यायालयाने मलिकांच्या याचिकेवर मंगळवारी (१५ मार्च) सुनावणीदरम्यान म्हटले.

मलिकांच्या प्रकरणावर विशेष न्यायालयात ७ मार्चला झालेल्या सुनावणीत त्यांची न्यायालयीन कोठडी २१ मार्चपर्यंत वाढवली. मलिकांची प्रकृती अस्वस्थ्यामुळे मलिकांची चौकशी पूर्णपणे करता आली नाही, असे ईडीने न्यायालयात सांगितले. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान मलिकांची तब्यात ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे गेल्या दिवसांपासून चौकशी करणे शक्य झाले नाही. यामुळे मलिकांच्या ईडीच्या चौकशीत वाढ करण्याची मागणी ईडीच्या वकिलानी न्यायालयात सांगितले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले आता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे संरक्षण करणार!

News Desk

“कसं काय शेलार बरं हाय का?”; अज्ञातांकडून थेट भाजप कार्यालयासमोरच पोस्टरबाजी

News Desk

आता राज्यातील रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk