नवी दिल्ली | महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे. तर काही ठिकाणी आज आगमन होईल. आज भाविक आपल्या प्रिय गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील. त्याबरोबरच महाराष्ट्रात अनेक नेते मंडळींच्या घरी गणरायाचं आगमन झालेल आहे. आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले, अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ट्विटर अकाउंटवरून मराठीतून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्यात.
ममता बॅनर्जींच्या मराठीतून गणेश भक्तांना शुभेच्छा
आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी मी श्रीगणेशाचरणी प्रार्थना करते. अशा शुभेच्छा ममता बॅनर्जी यांनी मराठीतून दिल्यानं आता हा चर्चेचा विषय झाला आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी मी श्रीगणेशाचरणी प्रार्थना करते.
गणपती बाप्पा मोरया!!!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) September 10, 2021
पंतप्रधानांकडून मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नाणेंद्र मोदींकडून भारतवासीयांना आज(१० सप्टेंबर) मराठी मधून गणेशोत्सवाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरीही गणेशभक्तांच्या मनातला उत्साह मोठा आहे. पुढचे १० दिवस हा उत्साह असाच कायम राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.