HW News Marathi
महाराष्ट्र

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट!

मुंबई। ममता बॅनर्जी ह्या आजपासून (30 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. ह्या तीन दिवसात ममता बॅनर्जी या कुणाकुणाच्या भेटी घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राजकीय आणि व्यावसायिक भेटीगाठी आहेत. त्यातली सर्वात महत्वाची भेट आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची. पण मुख्यमंत्र्यांवर अलिकडेच सर्जरी झालीय. त्यापार्श्वभूमीवर दोघांची भेट होईल की नाही याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. पण ममता बॅनर्जींच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडणार याकडेच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

ममता ह्या पवारांच्या भेटीसाठी मुंबईत

ममता बॅनर्जी ह्या आजच मुंबईत पोहोचणार आहेत. पुढचे तीन दिवस त्यांचा मुक्काम हा मुंबईत असेल. ह्या तीन दिवसाच्या काळात सर्वात महत्वाची राजकीय भेट असेल ती शरद पवार यांच्यासोबत. ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालला गेले होते आणि त्यानंतर आता ममता ह्या पवारांच्या भेटीसाठी मुंबईत असतील. गेल्या काही काळात दोन्ही नेत्यांचं काँग्रेससोबत देशपातळीवर फारसं जमून नाही. पवारांना यूपीएचं चेअरमन करावं अशी मागणी अधूनमधून उठत असते आणि त्यावर काँग्रेस नेते नाराज होतात. गेल्या आठवड्यात तर ममता बॅनर्जी ह्या दिल्लीत होत्या. त्यांनी पंतप्रधानांसह महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या पण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट मात्र घेतली नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावर ममतांच्या टीएमसीनं बहिष्कार टाकला. त्यामुळेच काँग्रेस आणि ममता यात सध्या तरी फारसं जमत नाही.

राजकीय निर्णयांची, मुद्यांची चर्चा

त्यामुळेच मुंबई दौऱ्यात ममता ह्या फक्त शरद पवारांनाच भेटतील हे निश्चित आहे. एखाद्या काँग्रेस नेत्याची भेट अजेंड्यावर नाही. पवार-ममतांमध्ये देशपातळीवरील राजकीय निर्णयांची, मुद्यांची चर्चा होऊ शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.ममता बॅनर्जी 1 डिसेंबर रोजी मुंबईत उद्योगपतींना भेटतील आणि त्यांना पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित करतील. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ममता बॅनर्जी उद्यापासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे हेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य आहे.

बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

तृणमूल काँग्रेसने भाजपशासित राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. देश पातळीवर एक मजबूत विरोधी पक्ष उभा करण्याचा विरोधी पक्षांचा विचार आहे, त्यानुसार हे राजकीय समीकरण आखणं सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशिवाय त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी १ डिसेंबर रोजी मुंबईत उद्योगपतींना भेटतील आणि त्यांना पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव

Aprna

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा करत राजीनाम्याची मागणी

News Desk

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात तब्बल आठ वर्षानंतर दोषारोप निश्चित!

News Desk