कोलकत्ता | बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या या शुभेच्छामुळे काहींना आनंद जरी झाला असला तरी, पश्चिम बंगालमधील त्यांचे काही समर्थक नाराज देखील झाल्याचे दिसत आहेत.
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी एका हिंदी ट्विटमध्ये भारतीयांना आणि भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, हिंदी दिवसासाठी ममता बॅनर्जींच्या शुभेच्छा महत्वपूर्ण भवानीपूर पोटनिवडणुकीच्यी बरोबर आल्या आहेत. ममता बॅनर्जींची खूर्ची कायम रहावी, यासाठी येथील पोट निवडणुकीची मागणी केली गेलेली आहे.
हिन्दी दिवस के अवसर पर सभी देशवासियों एवं हिन्दी भाषा के विकास में अपना योगदान दे रहे सभी भाषाविदों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Mamata Banerjee (@MamataOfficial) September 14, 2021
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही
हिंदी दिनाला विरोध म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण डोंबिवली विभागाच्या वतीने हिंदी ही कायद्याने राष्ट्रभाषा नाही म्हणून जनजागृती करण्यात आली. संपूर्ण देशात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशी अफवा पसरविले जाते. मात्र याचा अभ्यास केला तर कायद्यात कुठेही तसा उल्लेख नाही. हिंदी भाषा दिन साजरा करून हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा निषेध आज समितीच्या वतीने नोंदविण्यात आला. हिंदी लादणे थांबवा तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असे फलक घेऊन यावेळी जनजागृती करण्यात आली. यावेळी कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश तिखंडे, विलास चव्हाण, प्रशांत यांसह समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही पण मराठी ही राज्यभाषा आहे हे सांगण्याच्या दृष्टिकोनाने आज आम्ही हिंदी भाषेविषयी मराठी एकीकरण समितीतर्फे निषेध नोंदवत आहे असे मत कल्याण डोंबिवली अध्यक्ष गणेश तिखंडे यांनी सांगितले. शाळेत मुलांना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगितले जाते. मराठी या मातृभाषेला पर्याय म्हणून ती भाषा आली पाहिजे असेही शिकविले जाते. ही अफवा थांबणे आवश्यक असून हिंदी भाषे विषयी असलेली अफवा थांबली पाहिजे असे मत समितीचे कल्याण शहर समन्वयक भूषण पवार यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.