मुंबई । प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर काहीच काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले ते म्हणजे या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आता नव्या महत्त्वपूर्ण वळणावर असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास अर्थात NIA कडे सोपवण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या प्रकरणी आता संतप्त प्रतिक्रिया दिली आहे
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी खरंतर याआधी ATS कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिरने यांच्या पत्नी आणि मोठ्या मुलाने ATS कार्यालयात हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणाने महत्त्वपूर्ण वळण घेतले असून हे प्रकरण NIA कडे सोपविण्यात आले आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटांनी भरलेली गाडी आणि धमकीचे पात्र सापडल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा अचानक मृत्यू झाला आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ATS is probing Mansukh Hiren's case. System isn't just for one man. Previous govt had same system. We fully trust it hence ATS is on it. But despite that if Centre hands over the case to NIA, it'd mean something is fishy. We won't give up till we expose it: Maharashtra CM pic.twitter.com/nmDBMd3wyj
— ANI (@ANI) March 8, 2021
तर यात नक्कीच काळंबेरं | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे दिलेला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त तपास NIA कडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे.” त्याचप्रमाणे, आम्ही या प्रकरणाचा आता शेवटपर्यंत छडा लावू असा इशाराही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे, या प्रकरणावरून आता ठाकरे सरकार विरुद्ध मोदी सरकार असे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.