HW News Marathi
देश / विदेश

चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी, केंद्र सरकारने जारी केली नियमावली

नवी दिल्ली | देशात अनलॉक-५ च्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार हळूहळू अनेक नियमांमध्ये शिथिलता देत आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक ५ध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये ५० टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज १५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

काय आहे नियमावली –

१- चित्रपटगृहात केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक

२- चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे.

आसनव्यवस्था राखीव ठेवू नये

३- प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं

४- आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा

५- थर्मल स्क्रिनिंग करावी, केवळ लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजेटमुळे नाराजी, सेन्सेक्स घसरला

News Desk

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग AIIMS मध्ये दाखल

News Desk

मिशन गगनयानमुळे रोजगार निर्मितीत मोठी वाढ 

swarit