HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांकडून एकजण ताब्यात

मुंबई | मुंबईत मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खळबळ माजली होती. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. या आधी देखिल असा फोन आला होता त्यामूळे पुन्हा अशी घटना घडल्याने चिंता वाढली आहे.

मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांचा तपास सुरु

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे यानं पाठवलेला मेल सांयकाळी 6.20 ला प्राप्त झाला होता अशी माहिती आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही दुसरी घटना

राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानवी मनोरे न रचण्याचा सरकारचा आदेश!

News Desk

किरीट सोमय्यावर फौजदारी अब्रुनुकसानीचा १०० कोटींचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ

News Desk

“कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का ?”, राज ठाकरेंचा सवाल

News Desk