HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा मोर्चाची अमेरिकेत दखल

वॉशिंग्टन : मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चाची अमेरिकेतील “द वॉशिंग्टन पोस्ट” या वृत्तपत्रानेही दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या शिस्तबद्ध एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या या मोर्चाचे या परदेशी वृत्तपत्राने कौतुक केले आहे.

कोणतीही हुल्लडबाजी किंवा गडबड गोंधळ न करता आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून लाखो लोक सहभागी होऊनही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोणतीही मोठी संघटना किंवा राजकीय पक्ष पाठीशी नसतानाही मोर्चाचे नियोजनात सुसूत्रता होती. त्यामुळे हा मोर्चा जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. देशभरातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी याची दखल घेतलीच आहे, परंतु त्याबरोबरच अमेरिकेसारख्या प्रगत देशानेही त्याचे कौतुक केल्याने या मोर्चेकऱ्यांच्या यशात भर पडली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण – आदिती तटकरे

Aprna

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची पंकजा मुंडेंची मागणी रास्त – प्रविण दरेकर

News Desk

५० लाख रुपये द्या, अन्यथा वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवू!; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ

News Desk