HW News Marathi
महाराष्ट्र

Maratha Reservation : १६ तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं!

बीड | सर्वोच्च न्यायालयाने काल (५ मे) मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निश्चय केला आहे. बीडमध्ये आज (६ मे) मराठा आरक्षण संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या (७ मे) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे

मराठा समाजाच्या बैठकीत काय ठरलं?

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर बीडमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उद्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर १६ तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात ही बीड मधून होणार आहे.

विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

मराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केल्यानंतर ३० दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका ही दाखल करावी लागते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून मी शिवसेनेबद्दल असं म्हणालो”, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

News Desk

#CoronaVirus : जाणून घ्या…संचार बंदीमध्ये काय सुरू असणार, तर काय बंद

swarit

गली गली मे शोर है… अर्णव गोस्वामी चोर है…! अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

News Desk