HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांतदादांची उपस्थिती, काळे कपडे घालून मराठा मूकमोर्चा सुरू

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे. दरम्यान, काल संभाजीराजे यांनी हे आंदोलन शांतपणे कोणाशी न बोलता झाले पाहिजे असं सांगितलं होतं.

आज (१६ जून) सकाळी ८ वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले. त्यानंतर १० वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं आहे.

सगळ्यांनी घातला काळ्या पोशाख

यावेळी सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात आले होते. स्वत: संभाजीराजेही काळ्या पोशाखात आले होते. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क लावला होता. सरकारचा निषेध करण्यासाठीच सर्वांनी काळा पोशाख परिधान केला होता. तसेच आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं होतं.

नागरिक म्हणून मोर्चात – चंद्रकांत पाटील

मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा डाव फसला,भाजप कार्यकर्त्यांची धरपकड!

News Desk

“मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं”, रक्षा खडसे यांची ‘त्या’ प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया 

News Desk

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका!

News Desk