मुंबई | “मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे पांडुरंगाने दिलेला आशीर्वादच आहे”, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर शुक्रवारी (१२ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
Maratha Reservation case: Supreme Court refuses to stay Maratha reservation, However, SC said, 'we will hear the appeal for quashing of reservation for Maratha for admission in educational institution and government jobs' pic.twitter.com/215aECKFyk
— ANI (@ANI) July 12, 2019
मा. सर्वोच्च न्यायालयाने #मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य शासनाच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीला यानिमित्ताने पाठिंबाच मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या शुभदिनी आराध्य दैवत पांडुरंगाने दिलेला हा आशिर्वादच आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 12, 2019
राज्यात #मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)पदाच्या भरतीमध्ये SEBC प्रवर्गातील १३%आरक्षणानुसार ३४ जणांच्या नियुक्त्यांचे आदेश देण्यात आले.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 12, 2019
सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला असला तरीही पुढच्या दोन आठवड्यात या प्रकरणी उत्तर देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा समाजाला दिले गेलेले आरक्षण हे वैधच आहे, असा निर्णय दिला आहे. तसेच उच्च न्यायालायने मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्धच्या सर्व याचिका देखील फेटाळून लावल्या. त्यामुळे या याचिकाकर्त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.