HW News Marathi
महाराष्ट्र

आरक्षण द्या नाही तर पुन्हा आंदोलन पेटणार

मुंबई | आज मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली होती. ‘येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही. तर १ डिसेंबरपासून पुन्हा मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात केली जाईल’, असा इशारा या बैठकीत मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी विक्रमी असे मराठा क्रांती मूक मोर्चे काढले गेले. परंतु तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे जर नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला गेला नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिलेला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या या आढावा बैठकीला आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, संतोष सूर्यराव, महेश राणे हे समन्वयक उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपुर्वी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेऊन ठोक मोर्चे काढले होते. यात मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रात दंगलीचे स्वरुप आले होते. मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांच्या घरी आणि कार्यालया बाहेर देखील ठिय्या आंदोलने देखील केली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

News Desk

‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत – महेश तपासे

News Desk
शिक्षण

हिंदुजा कॉलेज मधील बॅचलर ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

swarit

मुंबई | के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स मधील वाहतूक व्यवस्थापन हे विद्यार्थी दरवर्षी असा एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवत असतात.गेली पाच वर्षांपासून हिंदुजा कॉलेज मध्यें बॅचलर ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट(BTM)ही पदवी सुरू केले आहे. या वर्षी १६० विध्यार्थ्यांनी रोडवर होणाऱ्या अपघातात अनेक लोकांनाच बळी जातात म्हणून हा एक उपक्रम केला.

विध्यार्थ्यांनी रोडवरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनधाराला हेल्मेटचे महत्व पटवून सांगितले.अनेक वाहनधाराक गाडी चालवत असताना मोबाईलचा वापार करत असतात त्यामुळे काही कसूर नसलेल्या नागरिकांचा बळी जातो. तर काही जण गाडी चालवताना व्हाट्सअॅपचा वापर करतात. त्यामुळे दुर्लक्ष होत आणि बळी जातो असे अनेक प्रकार होतात याच्यावर विध्यार्थ्यांनी लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले.”नजर हटी तो दुर्घटना घटी” अशी घोषणा ही विध्यार्थ्यांनी दिली.

रोडवरील खड्डे पडले आहेत यावर अनेक जणांचा बळी जातो याला जबाबदार कोण? असे अनेक सवाल लोकांना विचारले?, रोडवरील जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना असे अनेक प्रश्न विचारले आणि त्यांना अपघात कसे होतात आणि का होतात याला आपण काय केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.

रॅली एक शांततापूर्ण प्रात्यक्षिक होती जिथे विद्यार्थ्यांनी लोकांशी संवाद साधला आणि विनंती केली की, अखेरीस मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. विध्यार्थ्यांनी हातात पोस्टर व घोषणाबाजी करून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नाटकेही करण्यात आली ही रॅली हिंदुजा महाविद्यालयातून ते गायवाडी, सी.पी टॅंक,ठाकुरद्वार,गिरगांव, अशी काढण्यात आली. “ऑनलाईन इव्हेंट ही इन्स्टाग्राम चालू केला होता, यात अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. कार्यक्रमाचा ठसा हा एक पथनाट्य होता आणि त्यानंतर एक रॅली झाली.

सन्माननीय अतिथी म्हणून श्रीमती लिसा सदनह हे ‘हेलमेट गर्ल बांद्रा’ म्हणून ओळखले जाते. महाविद्यलयाच्या प्रिंसिपल डॉ मिनु मदलानी ,बीटीएम प्रोफेसर श्रद्धा जैन,सामाजिक कार्यकर्ते राजश्री नाथ असे अनेक मान्यवर उपस्थित होते. मला खूपच आनंद होत आहे. कारण बीटीएम हा एक नवीनच कोर्स असून त्यातील हा विध्यार्थ्यांनी हा कार्यक्रम केला. रस्त्यात्याबद्दल कसे सुरक्षित राहावे याबद्दल रॅली काढण्यात आली याबद्दल मला खूप अभिमान असल्याचे हिंदुजा कॉलेजच्या प्रिंसिपल डॉ. मिनु मदलानी यांनी म्हटले आहे.

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

देशात दहावीच्या निकालात मुलींची बाजी

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk