HW News Marathi
महाराष्ट्र

Maratha Reservation | डॉ. हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड

धुळे | मराठा आरक्षणासाठी आंदोलक अधिकअधिक आक्रमक झाल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. धुळ्यातील मराठा आंदोलकांनी भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. हिना या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या होत्या. त्यावेळी मराठा आंदोलकांनी हिना यांच्या गाडीवर चढून त्यांची तोडफोड केली.

सकल मराठा समाजाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान हिना यांच्या गाडीवर चढून घोषणाबाजी करत तोडफोड केली. या घटनेत हिना यांना सुरक्षितपणे गाडीतून बाहेर काढण्यात आले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्या लाठीचार्ज देखील करावा लागला.

आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. ‘मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे’, अनंत याने फेसबुकवर अशी पोस्ट लिहून आत्महत्या केली. तर दुसऱ्याकडे कोल्हापूरच्या कणेरवाडी येथील विनायक परशुराम गुदगे या तरुणानेही आत्महत्या केली. तसेच विनायक हा सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता होता. विनायकच्या आत्महत्यानंतर मराठा समाजानच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील दसरा चौकात रास्ता रोको केला आहे. रास्ता रोकोमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभागी झाले.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत ठाकरे सरकार नागरिकांना मोठा दिलासा देणार ? 

News Desk

‘काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका’, अमोल कोल्हेंवर काँग्रेसचा निशाणा!

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारने कसली कंबर!

News Desk