HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी

मुंबई | मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे आज कर्करोगाने निधन झाले आहे. फडके हे साठाव्या वर्षी आज (१४ मे) सकाळी अखेरचा श्वास घेतला. फडकेंच्या जाण्याने मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवरील असलेले त्यांचे प्रभुत्व त्यांनी वेगळी छाप सोडली. फडकेंच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

फडके यांचे ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या छोट्या पुस्तिकेपासून समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली होती. ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले ऍपही लोकांना खूप उपयुक्त ठरते आहे. तसेच फडकेंनी पुस्तकलेखनाबरोबरच त्यांनी शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. फडकेंनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. ते मूळचे ठाण्याचे होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

News Desk

“जयंत पाटलांनी पावसात भाषण करण्यापेक्षा गावांचा पाण्याचा प्रश्न आधी मिटवावा”

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय केला रद्द …

News Desk