HW News Marathi
महाराष्ट्र

लक्षवेधी आंदोलन करण्याची मराठवाड्याची परंपरा

मुंबईः लक्षवेधी आंदोलन करण्याची मराठवाड्यात जुणी परंपरा आहे. विजेच्या टॉवरवर चढणे, पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन करण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. मराठवाड्यातील प्रमुख दैनिकात दररोज अशा प्रकारच्या बातम्या झळकत असतात. शुक्रवारी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरूण मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खूर्द गावातील रहीवाशी असून माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने तीन तास आत्महत्येचा स्टंट केला.

कृषी मालाला हमी भाव मिळावा, मराठवाड्यातील अनुषेश दूर करावा, मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातून हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळावे, आदी मागण्या त्याने केल्या आहे. मुळात या सर्व मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. त्याने केवळ त्याची उजळणी केली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे त्याने आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्याच्या मागण्या खऱ्या असल्या तरी त्या पूर्ण होत नाहीत व होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे त्याने उचललेले पाऊल केवळ स्टंट ठरत आहे. राज्य सरकारने त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता निघाला आहे. त्यामुळे सरकार त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फोडण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या टीकेनंतर ‘या’ रस्त्यासंदर्भात प्रीतम मुंडेंनी लिहिले नितीन गडकरींना पत्र ‘

Aprna

मराठवाड्यातील खरीपाच्या पिकांना नवसंजीवनी

News Desk

वर्धा येथील लष्करी तळावर भीषण स्फोट, ६ जणांचा मृत्यू

News Desk