HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद पोलीस अधिकाऱ्यांना संपत्ती दाखवण्याची नोटीस

 

मुंबई: राज्यातील कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांना केव्हा त्यांची मालमत्ता जाहीर करायला लावतील याचा काही नेम नाही. आता त्यात भर म्हणजे राज्याच्या गृह विभागाने १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या या यादीत शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे यांचही नाव आहे ही बाब आश्चर्याची आहे.

गृह विभागाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ आयपीएस अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न जाहीर केलेले नाही, असे विभागाने राज्य सरकारला कळवले आहे. या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु राय यांचाही समावेश करण्यात आला आहे. या बरोबरच या यादीत काही निवृत्त अधिकारी, तसेच काहींना पदावरून हटवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

यादीमध्ये नेमकी कोणाच्या नावांचा समावेश आहे?

रॉय यांनी मे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. तर, या यादीत माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचेही नाव आहे. सहाय यांचा २०१३ मध्ये जळून मृत्यू झाला होता. यादीतील पुढील नाव म्हणजे माजी पोलीस आयुक्त आनंद मांड्या. २०१८ साली निवृत्त झाल्यानंतर १५ दिवसांनी मृत्यू पावलेल्या मांड्या यांचंही या यादीत नाव आहे. यादीमध्ये मृत अधिकाऱ्यां व्यतिरिक्त, निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे, २०१८ साली लाच स्वीकारताना पकडले गेल्यामुळे नोकरी गमावलेले आपीएस अधिकारी विजय कृष्ण यादव, १२ वर्षांपर्यंत ड्युटीवरून गायब राहिलेल्या आणि २०१७ मध्ये निवृत्त झाल्याचे मानल्या गेलेल्या १९९१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी मॅरी लुई फर्नांडीस यांचाही समावेश आहे.

गृह विभागाने जाहीर केलेल्या या यादीत एकूण १४ पोलीस अधिकाऱ्यांची नावे असून त्यांपैकी फक्त ६ अधिकारीच सध्या नोकरीत आहेत. यात पी.एन. रासकर, दलबीर सिंह भारती, अजय कुमार बंसल, पी.एन. मगर, अंकित गोयल आणि हिरानी ए. मोहन कुमार यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या रायगड फार्महाऊसची रेकी करणाऱ्या ३ जणांना अटक

News Desk

भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रानअली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk