HW News Marathi
देश / विदेश

मेरी कोम विजयी, पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे

टोक्यो। भारताची सर्वोत्कृष्ट बॉक्सिंग खेळाडू मेरी कोम हिने आज (२५ जुलै) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवला आहे.मेरीसाठी हा सामना जिंकणं सोपं नव्हतं. परंतु, मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सामना आपल्या बाजूनं फिरवला. महिला बॉक्सिंगमधील पहिला सामना जिंकत मेरीनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. मेरीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. मेरी कोमनं हर्नांडिज गार्सियाचा पराभव करत पुढची फेरी गाठली आहे. सामन्याची सुरुवात झाल्यापासूनच मेरी कोमच्या अुभवाची झलक पाहायला मिळाली आहे.

मनीषा बात्राचा विजय

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारताला टेबल टेनिस मध्ये देखील विजय मिळाला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार विजय मिळवला आहे. तिनं युक्रेनच्या मार्गारिटाला ४-३ असं पराभूत केलं. भारताच्या मनिका बत्रानं सुरुवातीला दोन गेम गमावले. ती 0-२ अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिनं शानदार वापसी केली आहे. पिछाडीवर असताना मनिकानं २-२ अशी बरोबरी केली. पुढचा सेट मार्गारिटानं जिंकत पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर मनिकानं पुन्हा वापसी केली. मनिका आणि मागरिटा ३-३ अशा बरोबरी झाली.

सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू

बॅडमिंटणपट्टू PV सिंधू ही एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे हे आज तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे. रिओ-ब्राझील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी व्ही सिंधूकडून यावेळीही भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. पी व्ही सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून यावेळी तिच्यासोबत इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग यांचा समावेश आहे. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे.

सुरुवातीला धीम्या गतीने खेळणाऱ्या सिंधूने नंतर मात्र वेग पकडला. दोन्ही गेम्स सहज जिंकत सिंधूने आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये का गणले जात आहोत याची चुणूक दाखवून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna

उत्तर कोरिया पुन्हा ‘धमाका’ करण्याच्या तयारी

News Desk

ताजमहाल की शिवमंदिर?

News Desk