HW News Marathi
महाराष्ट्र

भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू

मुंबई | भाटिया रुग्णालयाजवळील नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेमध्ये १५ जण जखमी झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नायर रुग्णालयात ५, कस्तुरबा रुग्णालयात १ आणि भाटिया रुग्णालयात एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कमला इमारतीमध्ये लागलेली आग लेवल ३ ची आग होती असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. 

सकाळी साडेसातच्या दरम्यान इमारतीला आग लागली आहे अशी माहिती अग्निशाम दलाकडून देण्यात आली आहे. या आगीच्या घटनेत १५ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी १३ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. तर आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

दरम्यान, भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १५ जणांपाकी १२ जणांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर तिघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी पैकी ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन- प्रिया बेर्डे

News Desk

मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या घोषणा; पहा काय आहेत घोषणा

Manasi Devkar

विदर्भात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

News Desk