HW Marathi
महाराष्ट्र

नागपूरमध्ये रुग्णालयाला भीषण आग

नागपूर | नागपूरमधील किंग्जवे रुग्णालयाला बुधवारी (९ जानेवारी) दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरु होते. अद्याप या आगीमागचे कारण स्पष्ट झाले नसून येथील सर्व कामगार सुखरूप आहेत. परंतु, या रुग्णालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ३ महिला अडकल्याची माहिती मिळत आहे.अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Related posts

आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही | शरद पवार

अपर्णा गोतपागर

मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे केले वाटप

News Desk

महाड येथे काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

News Desk