HW News Marathi
महाराष्ट्र

हत्तीच्या पिल्लाचं ‘चिवा’ आणि माकडाच्या पिल्लाचं नाव ‘चंपा’ ठेवू

मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध राणी बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जन्माला आलेल्या पेंग्विनच्या पिलाचं नाव ‘ऑस्कर’ हे नाव ठेवण्यात आलं. तर एकीकडे ठाकरे सरकारने सर्व दुकानांच्या मराठी पाट्यांसंदर्भात घेतलेला निर्णय आणि दुसरीकडे पेंग्विनच्या पिलाचं इंग्रजी नाव ठेवल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना हल्लाबोल केला आहे.

राणीच्या बागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाच्या बछड्याचं नुकतंच बारसं झालं आहे. यापैकी पेंग्विनच्या दोन पिल्लांना ऑस्कर आणि ओरिओ अशी नावे देण्यात आली. तर वाघाच्या बछड्यांचं वीरा हे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र, सरकारला मराठीचा पुळका केवळ देखाव्यापुरता आहे असे म्हणत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेंग्विनंच नाव मात्र इंग्रजीत, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन लगावला होता. त्यांच्या या टीकेवर उत्तर देताना किशोरी पेडणेकरांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘चंपा’ आणि ‘चिवा’ नाव देऊ

पेडणेकर म्हणाल्या, “विरोहत्तीच्या पिल्लाचं ‘चंपा’ आणि माकडाच्या पिल्लाचं नाव ‘चिवा’ ठेवू

धक सांगत आहेत की, नावं मराठीत ठेवा तर वाघिणीच्या बछड्याचं नाव वीरा ठेवलं आहे ना.. पेंग्विन हे मुलांसाठी एक वेगळं आकर्षण आहे. पण इतक्या खालच्या स्तरावर येऊन जर भाजप टीका करणार असेल तर पुढच्या वेळेला आपण हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाला चिवा असं नाव देऊ”, असा खोचक टोला पेडणेकरांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एक नाची जे काही बोलतेय ते वादग्रस्त”- विजय वडेट्टीवार

News Desk

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता शरद पवारांच्या दरबारी जाणार

News Desk

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत होणार बैठक, हार्दीक पटेल राहणार उपस्थित

News Desk