HW News Marathi
Covid-19

महापौरांनी कोरोना लसीला दिली ‘कलियुगातील संजीवनी’ची उपमा 

मुंबई | मुंबईतही आता कोरोनाची लस दाखल झाली असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. कलियुगातील संजीवनी मुंबईत आली आहे. आता घाबरून जायचं कारण नाही. काळजी करू नका, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. १६ जानेवारीपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. किशोरी पेडणेकर यांनी असं म्हटलं आहे की, आता घाबरू नका. काळजी करण्याचं काम नाही. मुंबईत कलियुगातील संजीवनी आली आहे. त्यामुळे कोरोनाचा खात्मा होणार असून मुंबईकरांना मोठी संजीवनी मिळणार आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

मुंबईत एकूण १,३९,५०० लस आल्या आहेत. मुंबईत एकूण १ लाख ३० हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली आहे. मुंबईत ९ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने आधीपासूनच तयारी केली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत आज आलेली कोरोना लस मुंबईत परळच्या कोल्ड स्टोअरमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर इतर ९ केंद्रावर ही लस पाठवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोरोना लसबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज निर्माण झाल्याचं ऐकून आहे. काही लोक गैरसमज पसरवत असून हे योग्य नाही. लोकांनी या लसीबाबत गैरसमज पसरवू नये. तसेच नागरिकांनीही अशा अफवांना बळी पडून घाबरून जावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

मुंबईतील कोव्हिड सेंटरमध्ये सद्यस्थितीत ७५ टक्के बेड शिल्लक आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन सिस्टम देखील सज्ज आहे. रुग्ण वाढले तरी मुंबई सज्ज आहे. आपल्याकडे मुबलक स्टाफ उपलब्ध आहे. तसेच ब्रिटनमधून नवा कोरोनाचा रुग्ण आला तरी त्यासाठी देखील पालिकेने तयारी केली आहे. सध्या 7 हजार रुग्ण आहेत. बेड रिकामे असले तरी आपण स्टाफला कायम ठेवलं आहे. कारण त्या स्टाफची आपल्याला केव्हाही गरज पडू शकते.

सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?

शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या, शरद पवारांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

News Desk

कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास BMC ची परवानगी आवश्यक!

Aprna

राज्यात आजही ९ हजारांच्या वर कोरोना रुग्णांची नोंद

News Desk