HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच!

यवतमाळ। यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीएसएस तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचे पडसाद विदर्भात पसरले आहे. खून प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे रुग्णसेवा ठप्प झाली आहे. खून प्रकरणाची सीबीआय, सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सुरक्षांचा अभाव असल्याने डॉक्टरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने पथदिवे, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, वाढलेले गवत, झुडेझुडपांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. पहिल्या दिवशी केलेल्या सध्या आणि सोप्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. आयएमएकडूनही आज रुग्णालय बंद ठेऊन आंदोलन करण्यात येत आहे.

नेमकं काय झालं होतं?

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. डॉ अशोक पाल असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. अद्याप हत्येचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हत्येनंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांकडून संताप केला जात आहे. परिसरात विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.

महाविद्यालयाच्या परिसरातच हत्या

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची अमानुषपणे हत्या झाली. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केलाय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय, भातखळकरांची टीका

News Desk

असंवेदनशील, अहंकारी व शेतकऱ्याचा मारेकरी पंतप्रधान म्हणून इतिहासात मोदींची नोंद! – नाना पटोले

Aprna

शेतकरी लाँग मार्च मोर्चाची मुंबईच्या दिशेने आगेकूच

News Desk