HW News Marathi
Covid-19

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरू होणार !

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढत होत आहे. या राज्यातील रुग्णांची संख्या लक्ष्यात घेवून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेसाठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरू होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. यानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे.

देशमुख म्हणाले, वैद्यकीय विभागाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत. तिथेच परीक्षा घेण्यात येथील असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष वेळेनुसारच सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात डॉक्टर, नर्स हे युद्ध पातळीवर काम करत आहे. त्या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स किंवा जी काही पदे रिक्त असतील. ती भरण्यासाठी मंजूर देण्यात आली असून त्या संदर्भातील कार्यवाहीस सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

अमित विलासराव देशमुख यांनी काल (४ जून) राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केले आहे असे अमित देशमुख यांनी सांगितले.

 

 

Related posts

राज्यात आज १५,५७५ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

News Desk

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील कर्तव्ये पार पाडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण !

News Desk