HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात इगतपुरी येथे दोन ठिकाणी 100 एकर परिसरात मेडीकल टूरीझम हब उभारणार | जयकुमार रावल

मुंबई | संपूर्ण देशात 2020 पर्यंत मेडीकल टूरिझम वाढविण्याच्या अनुषंगाने परदेशातील अनेक संस्था सुमारे 500 बिलीयन गुंतवणूक करणार आहेत. महाराष्ट्र हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस टूरिझमच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कार्यशाळेत मुंंबई येथे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील इगतपुरीजवळ शासनाने दोन भव्य असे 100 एकर जागा असलेले प्लॉट निश्‍चित केले असून तेथे मेंडीकल टूरीझम हब उभारण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी पॅनडोझा सोल्युशन प्रा.लि. यांच्यावतीने हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस टूरिझम मेळावा मुंबई येथील ताज हॉटेल येथे घेण्यात आला होता. या कार्यशाळेसाठी वैद्यकीय दंतचिकित्सा, आयुष हॉस्पीटॅलिटी व पर्यटन उद्योगाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पदमश्री रमाकांत पांडा, गांभीयाचे राजदूत जैन बा जॅग्यु, पॅन्डोझा सोल्यूशन प्रा.लि.चे संचालक डॉ. मालविका खडके, डॉ. अनिल बनकर आणि रेखा चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या उत्तरार्धात राज्याचे स्कील डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड लेबरचे विद्यमान मंत्री संभाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मेडीकल टूरीझम अर्थात वेद्यकीय पर्यटन हे मोठया प्रभावीपणे काम करत आहेत. ते म्हणाले की, या उद्योग क्षेत्रासाठी लागणारे प्रगतशील तंत्रज्ञान व बुध्दीसाठी मदत पुरवली जाईल. पॅन्डोझा सोल्युशनने या वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात एक वेगळे पाऊल निर्माण केले असून महाराष्ट्र राज्य हे या उद्योग क्षेत्रातून सर्वसामान्यपणे चांगला फायदेशीर महसूल गोळा करेल.

या कार्यशाळेसाठी रिलांयन्स, हिंदुजा, एशियन हार्ट हॉस्पीटल, कोकिलाबेन, रहेजा, सै फी, संचेती आदी हॉस्पीटलचे तसेच मान्यवर डॉक्टर्स, वैद्यकीय पर्यटन क्षेत्राशी निगडीत फार्मा कंपनी, स्पा, ट्रॅव्हल एजन्सी, इंन्शुरन्स कंपनी, शासकीय प्रतिनिधी, गुंतवणूकदार, हॉटेल व एअरलायन्सचे मान्यवर प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीचे दिले निमंत्रण

News Desk

नौका उलटली; पण मोबाइलने तारले

News Desk

“त्या महिलेनेच अंगातील झगा काढला”, गृहमंत्र्यांनी जळगाव वसतिगृहात काय घडले ते सांगितलं

News Desk
राजकारण

अजब जाहिरात…. प्रचाराला मुले भाड्याने मिळतील?

News Desk

सांगली | सांगली महापालिकेच्या निवडणुक प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अजब जाहिरात सांगलीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रचारात विविध रंग भरण्यासाठी सगळे पक्ष जोमाने तयारीला लागले असून एकमेकांच्या वरचढ ठरण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत.

सांगलीत हरिपूर रोडवर असलेल्या पाटणे प्लॉट येथील एका बोर्डवर सगळ्याचे लक्ष वेधले जात आहे. याचे कारण म्हणजे या बोर्ड असलेला मजकूर. या बोर्डवर जे लिहिले आहे ते बघून तुम्हाला देखील धक्का बसेल. बोर्डवर ‘आत्ताच सावकार व्हा’ असे लिहिले आहे. तसेच ‘प्रचाराला मुले भाड्याने मिळतील असे या बोर्डवर लिहिण्यात आले आहे याशिवाय संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देखील देण्यात आला आहे. प्रचार हा कार्यकर्त्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.पाठीशी कार्यकर्ते असल्यावर प्रचार करताना वेगळी छाप पडते. म्हणून या काळात आमिष दाखवून लोकांना आकर्षित केले जाते.

सांगलीत सध्या हा बोर्ड सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडीयावर ह्या बातमीने चांगलाच जोर धरला आहे. निवडणुका आल्या की अनेक चर्चांना उधान येते, कार्यकर्त्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम असो किंवा अन्य काही मागण्या असो, कार्यकर्त्यांना चांगलीच मागणी आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

Related posts

आता शाळेत हजेरी लावताना ‘जय हिंद’, ‘जय भारत’ म्हणा

News Desk

निरंजन डावखरेंचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश

News Desk

संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे !

News Desk