HW News Marathi
महाराष्ट्र

अनाथ युवक युवतींचा दिवाळीनिमित्त मेळावा

मुंबई | अनाथाचे आधार या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिनांक १८ नोव्हेंबरला १८ वर्षांवरील अनाथ युवक युवतींचा दिवाळी निमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा आधार आश्रम घारपुरे नाशिक येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, नाशिकच्या महापौर रंजना भानशी, एसीपी स्वाती आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्राना श्रीकांत भारतीय यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शासनाच्या मध्यमातून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अभय तेली यांनी मुलांच्या समस्या मांडल्या. अनाथांचे हक्क मिळवण्यासाठी कशा प्रकारचे नियोजन असेल ह्याची चर्चा केली. तसेच यावेळी युवा आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गोरख उबाळे यांनी प्रत्येक अनाथ युवा-युवतींना हक्काचे घर मिळून देणार त्याच प्रमाणे प्रत्येकाला डॉक्युमेंट मिळून देण्यासाठी संस्था पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.

अनाथ मुलींना येणाऱ्या समस्या आणि त्यातून मार्ग कसा कडवा याचे मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आले. कामाचा अनुभव यावेळी अनेकांनी सविस्तरपणे मांडला. समाजातील व्यक्तींचा अनाथांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे मत अमित वासणीक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मांडले. कार्यक्रमात युवा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख उबाळे, चिल्ड्रन्स आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक पुजारी, निराधार विद्यार्थी प्रागतिक संस्थेचे अध्यक्ष आनंद निर्मल, जाणीव संस्थेचे सदस्य यांच्यासह अनेक संस्थांचे सदस्य अध्यक्ष सहभागी झाले होते. अनेक मुलांनी यावेळी आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे नियोजन सुलक्षणा आहेर आणि अभय तेली यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण ,खानदेशात कोरोनाचा शिरकाव !

swarit

खाम नदीच्या पुनरूज्जीवनातून शहराचा शाश्वत विकास! – आदित्य ठाकरे

Aprna

भाजपच्या ‘संकल्प पत्र’तील महत्त्वाचे मुद्दे

News Desk