HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होणार

मुंबई | काँग्रेस नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी नुकतेच लिलावतीतून डिस्चार्ज मिळालेले शिवसेनेचे आमदार संजय राऊत हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी पोहचणार आहे. सत्तेतील सहभागाबाबत काँग्रेसची भूमिक स्पष्ट केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची ५-५ जणांची समिती तयार करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्रिपद हे अडीच-अडीच वर्षांसाठी असेल. पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा तर दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. उपमुख्यमंत्रिपद पाचही वर्षे काँग्रेसकडे राहील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेची नावे समाविष्ट होतील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडणार हे केवळ स्वप्नरंजन

News Desk

राज्यपालांच्या हस्ते दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Aprna

भीमा कोरेगाव इतिहास शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना रामदास आठवले पत्र लिहिणार

News Desk