HW News Marathi
Covid-19

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या मुद्द्यावर सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२५ मे) सकाळी राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल यांनी पवार यांना भेटींचे निमंत्रण दिले होते. आणि पवारांनी राज्यपालांच्या भेटीला मान देत राजभवनावर भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, राज्यपाल आणि पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नुकतेच भाजपकडून ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनही करण्यात आले होते. यानंतर श्रमिक ट्रेनवरून रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्या ट्वीटवर वाकयुद्ध पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी आज (२४ मे) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाध साधला. यावेळ मुख्यमंत्री म्हणाले, “राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत,” असा रेल्वेमंत्र्यांवर आरोप केला. यानंतर गोयल यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या आरोपला प्रतिउत्तर दिले. “महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे,” असे ते ट्वीटद्वारे म्हणाले होते.

दरम्यान, महाविकासआघाडीचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन काही प्रस्ताव ठेवतात का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार यांनी यापूर्वी अनेक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकरी प्रश्न, आर्थिक पॅकेज, स्थलांतरित मंजूर आदी मुद्द्यांवरुन पत्र पाठवून केंद्राला सूचना केल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने ‘या’ कारणासाठी घेतली शरद पवारांची भेट

News Desk

सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन,जयंत पाटलांची घोषणा !

News Desk

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार – मुख्यमंत्री

News Desk