HW News Marathi
महाराष्ट्र

भीम आर्मीची उद्या अमरावतीमध्ये सभा

मुंबई | भीम आर्मी संघटनेकडून उद्या अमरावतीमध्ये सभा ठेवण्यात आली आहे. या सभेला परवानगी देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणारी भीम आर्मीची सभा रद्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे भीम आर्मीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना महाराष्ट्रात सभा घेण्यास पहिल्यांदाच परवानगी मिळाली आहे. अमरावती येथे चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. आतापर्यंत चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबईतील आणि पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता अमरावतीमध्ये पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी दिल्यामुळे उद्या दुपारी दोन वाजता त्यांची अमरावतीमध्ये सभा होणार आहे. अमरावती येथील सायन्स कोअर मैदानावर चंद्रशेखर आझाद यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : हे सरकार चोऱ्या करायला बसले; पडळकरांचे सरकारवर हल्लाबोल

Aprna

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात!

News Desk

महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही !, प्रविण दरेकरांचा इशारा 

News Desk