HW News Marathi
महाराष्ट्र

OBC समाजाच्या मागण्यांबाबत भुजबळांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक

मुंबई | OBC समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतीची व इतर लाभांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन परिणामकारक कार्यवाही होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती/लाभ प्रस्तावित करण्यासंदर्भात अभ्यास करुन मंत्रिमंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील झाली.

बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

महाज्योती संस्थेसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह योजना सुरू करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा. स्वाधार योजनेसारखी समकक्ष नवीन योजना ओबीसींना सुद्धा लागू करावी. सन २०१९-२० या वर्षाकरिता ओबीसी, व्हीजेएनटी, एसईबीसी या प्रवर्गातील राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीसह सन २०२०-२१ या वर्षासाठीचा तरतूद केलेला निधी एकत्रित करून उपलब्ध करून द्यावा. ओबीसी, व्हीजेएनटी, एसईबीसी, समाजच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून राज्यातील ओबीसी समाजाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी रकमेची तरतुद करण्यात यावी, यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी स्वतंत्र घरकुल योजना अस्तित्वात नाही. इतर मागास प्रवर्गाकरीत प्रस्तावित सावित्रीबाई फुले घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.राज्य शासनाच्या विविध विभागात मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या पदोन्नत्या प्रलंबित आहेत. इतर राज्यांनी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील निर्णय घेणे आवश्यक आहे. इतर मागास प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्यात यावी, या विषयावर उपसमितीमध्ये चर्चा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ना डरुंगी ना झुकुंगी”, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट

News Desk

पूर्वी ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता ‘ईडी’चा डाव खेळतात !

News Desk

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते  – जयंत पाटील

News Desk